Total Pageviews

Sunday, March 29, 2009

Anubhav

काही दिवसांपुर्वी माझा मोबाईल हरवला आणि पोलिस या प्रकाराशी माझा संबंध आला. मला एफ़ आय आर ची प्रत ७२ त्तासांच्या आत मोबाईल ऑफिस ला जमा करायची होती. पोलीसांनी माझी तक्रार नोंदवुन घेतली. प्रत २-३ दिवसांनी मिळेल आणि प्रोसेसिंग ला तेवढे दिवस
लागतिलच वगैरे सांगितले.

मला ते लवकरात लवकर हवे होते म्हणुन मी त्यांना विनंती केली. मग ते म्हणाले कि उद्या दुपारी ये आणि घेउन जा. दुसरया दिवशी गेल्यावर साहेबांची आज नाईट शिफ़्ट आहे रात्री १० ला या असे सांगण्यात आले. तेवढ्या एका कागदासाठी तेच साहेब का हवेत हे मला समजत नव्हते . अशाच सलग २-३ दिवस चकरा मारल्यानंतर १ दिवस त्यानी मला १ कागद xerox करून आणायला सांगीतले
हा तोच कागद होता ज्यावर पहिल्या दिवशी त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली होती .हे त्याना पहिल्या दिवशी सुध्धा करता आले असते. सुद्न्यृ वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल की त्यांनी मला का चकरा मारायला लावल्या .समाधान फ़क्त हेच होते की मी कुठल्याही प्रकारची लाच दिली नव्हती .
 
Netbhet.com Me Marathi!