Total Pageviews

Wednesday, February 17, 2010

...प्रेम .. प्रेम म्हणजे काय असते

त्या दिवशी मला तीन इंटरव्यू द्यायचे होते ....आणि परत संध्याकाळी ऑफिस ला यायचे होते
शेवटी कसे बसे सगळे इंटरव्यू देऊन मी घरी निघालो . बंड गार्डन च्या बागे जवळ आल्यावर लक्षात आले कि आपल्याला खूप भूक लागली आहे . मग मी निवांत रगडा पँटिस स खात तिथे उभा राहिलो आपण कसले भारी आहोत दिवसभर काहीच खाल्ले नाही. असे काहीतरी मनात चालू होते.
...तेवढ्यात एक बाई भिक मागत माझ्या जवळ आली. आधी मी दुर्लक्ष केले . कारण या लोकांकडून पैसे दुसरेच कुणीतरी घेतो असे मी ऐकले होते . पण तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते कि तिने २-३ दिवसांपासून काहीच खाल्लेले नाही. मी विचार केला कि हिला भिक देण्याऐवजी खायला देवू या. त्या गाडी वाल्याला तिला एक रगडा द्यायला सांगितले.नंतर थोडे लांब जाऊन ती माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. बराच वेळ झाला तरी ती खायला सुरुवात करेना ....मला कुतूहल वाटले म्हणून मी तिच्याकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने तिचा नवरा कुठून तरी गर्दीतून आला आणि मग त्या दोघांनीही खायला सुरुवात केली. क्षण भर मी स्तब्ध झालो . तिला इतकी भूक लागलेली असेल कि ती एकटी ते खाऊ शकली असती.. एवढे गरीब असूनही ते दोघे प्रेमात मात्र खूप श्रीमंत होते. मला लक्षात आले कि प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते .

Wednesday, February 10, 2010

मी नाही काच फोडली...:-)

हि खूप लहान पणीची गोष्ट आहे . मी आणि माझा मोठा भाऊ आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. आजच्यासाराखी नाही पण कधी कधी लाईट तेव्हा हि जात असे .लाईट गेल्यावर माझा मोठा भाऊ त्या नातेवाईकाची ब्याटरी घेऊन गाडी गाडी खेळू लागला .मग काय घ्यांग$$ घ्यांग $$ (हा गाडीचा आवाज आहे) सगळ्या घरात गाडी फिरू लागली.नातेवाईकाचा जीव खाली वर होत होता कि पोरगा काच फोडतोय वाटते .पण सांगणार कसे आम्ही पाहुणे !!
थोडा वेळाने कुणीच नसलेल्या घरात भावाकडून गाडीची (ब्याटरी ची ) काच फुटली कारण गाडी पोत्यावरून पडली. मग मी आणि भाऊ दोघेही थोडे घाबरलो . मग ब्याटरी गुपचूप पोत्याच्या मागे लपवून ठेवली आणि आम्ही दोघे बाहेर जाऊन बसलो.
संध्याकाळची वेळ होती काही मोठी मुले लपा छपी खेळत होती.अंधारामुळे काहीच दिसत नव्हते । चुकून त्यातल्या एकाने (खेळातला समजून)भावालाच मागून पकडले ॥मग काय भाऊ आधीच घाबरलेला होता . त्यातच तो ओरडू लागला " मी नाही काच फोडली , मी खरच नाही फोडली " भाऊ खूप घाबरून हात पाय झाडत ओरडत होता .त्याच्या अशा ओरडण्याने तो पकडणारा हि घाबरला ...नंतर त्याच्या लक्षात आले कि हा पाहुणा आहे... पण तो असे का ओरडतोय हे काही त्याच्या लक्षात येइना :)
खरे कारण मला सोडून कुणालाही माहित नव्हते...
आजहि ही गोष्ट आठवल्यावर मात्र हसू आल्याशिवाय राहत नाही
 
Netbhet.com Me Marathi!