Total Pageviews

Friday, October 1, 2010

निकालाचा गोंधळ ...


बहु प्रतीक्षित आयोध्या प्रकरणाचा काल निकाल लागला . आयोध्येच्या निकालाच्या वेळी पुन्हा bahrtiyani आपण बेशिस्त आहोत हे दाखवून दिले.
निकाल आल्या आल्या काही वकिलांनी stage वर गर्दी केली . v चे साईन दाखवत गोंधळ करू लागले . जसे काय हे सगळे निवडूनच आले आहेत .काही मान्यवर लोकांनाही निकाल सांगण्यासाठी मेडिया समोर येण्याची धावपळ , काही लोकान्हे तिथूनच mobile वर बोलणे.
मेडिया वाल्यांचा गोंधळ तर काही विचारायलाच नको. त्यांना कुठल्याही प्रकारची शिस्त लावता येणे अशक्य .पोलिसांनी २-३ फटके लावले असते तर शांत बसले असते.पण मेडिया वाले "धरले तर चावतंय ,सोडले तर पळतंय " असा प्रकार असतो . पूर्ण निकाल वाचून झाला तरी कुणालाही काहीहि समजले नव्हते .
हेच जर आल्यावर सगळे लोक व्यवस्थित शांत बसले असते . एकाच प्रवक्ता stage वरून बोलला असता तर चांगले दिसले नसते का ? मेडिया ने हे तरी लक्षात घ्यायला हवे कि हे video सगळ्या जगात दाखवले जातात .थोडे तरी वर्तन सुधारा ..जावब्दारीने वागायला शिका .या सर्वाना सद्बुद्धी दे ही प्रभू राम
चंद्राचरणी प्रार्थना !!

Wednesday, February 17, 2010

...प्रेम .. प्रेम म्हणजे काय असते

त्या दिवशी मला तीन इंटरव्यू द्यायचे होते ....आणि परत संध्याकाळी ऑफिस ला यायचे होते
शेवटी कसे बसे सगळे इंटरव्यू देऊन मी घरी निघालो . बंड गार्डन च्या बागे जवळ आल्यावर लक्षात आले कि आपल्याला खूप भूक लागली आहे . मग मी निवांत रगडा पँटिस स खात तिथे उभा राहिलो आपण कसले भारी आहोत दिवसभर काहीच खाल्ले नाही. असे काहीतरी मनात चालू होते.
...तेवढ्यात एक बाई भिक मागत माझ्या जवळ आली. आधी मी दुर्लक्ष केले . कारण या लोकांकडून पैसे दुसरेच कुणीतरी घेतो असे मी ऐकले होते . पण तिच्या चेहऱ्यावरून असे वाटत होते कि तिने २-३ दिवसांपासून काहीच खाल्लेले नाही. मी विचार केला कि हिला भिक देण्याऐवजी खायला देवू या. त्या गाडी वाल्याला तिला एक रगडा द्यायला सांगितले.नंतर थोडे लांब जाऊन ती माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. बराच वेळ झाला तरी ती खायला सुरुवात करेना ....मला कुतूहल वाटले म्हणून मी तिच्याकडे पाहत राहिलो. थोड्या वेळाने तिचा नवरा कुठून तरी गर्दीतून आला आणि मग त्या दोघांनीही खायला सुरुवात केली. क्षण भर मी स्तब्ध झालो . तिला इतकी भूक लागलेली असेल कि ती एकटी ते खाऊ शकली असती.. एवढे गरीब असूनही ते दोघे प्रेमात मात्र खूप श्रीमंत होते. मला लक्षात आले कि प्रेम प्रेम म्हणजे नक्की काय असते .

Wednesday, February 10, 2010

मी नाही काच फोडली...:-)

हि खूप लहान पणीची गोष्ट आहे . मी आणि माझा मोठा भाऊ आमच्या एका नातेवाईकांकडे गेलो होतो. आजच्यासाराखी नाही पण कधी कधी लाईट तेव्हा हि जात असे .लाईट गेल्यावर माझा मोठा भाऊ त्या नातेवाईकाची ब्याटरी घेऊन गाडी गाडी खेळू लागला .मग काय घ्यांग$$ घ्यांग $$ (हा गाडीचा आवाज आहे) सगळ्या घरात गाडी फिरू लागली.नातेवाईकाचा जीव खाली वर होत होता कि पोरगा काच फोडतोय वाटते .पण सांगणार कसे आम्ही पाहुणे !!
थोडा वेळाने कुणीच नसलेल्या घरात भावाकडून गाडीची (ब्याटरी ची ) काच फुटली कारण गाडी पोत्यावरून पडली. मग मी आणि भाऊ दोघेही थोडे घाबरलो . मग ब्याटरी गुपचूप पोत्याच्या मागे लपवून ठेवली आणि आम्ही दोघे बाहेर जाऊन बसलो.
संध्याकाळची वेळ होती काही मोठी मुले लपा छपी खेळत होती.अंधारामुळे काहीच दिसत नव्हते । चुकून त्यातल्या एकाने (खेळातला समजून)भावालाच मागून पकडले ॥मग काय भाऊ आधीच घाबरलेला होता . त्यातच तो ओरडू लागला " मी नाही काच फोडली , मी खरच नाही फोडली " भाऊ खूप घाबरून हात पाय झाडत ओरडत होता .त्याच्या अशा ओरडण्याने तो पकडणारा हि घाबरला ...नंतर त्याच्या लक्षात आले कि हा पाहुणा आहे... पण तो असे का ओरडतोय हे काही त्याच्या लक्षात येइना :)
खरे कारण मला सोडून कुणालाही माहित नव्हते...
आजहि ही गोष्ट आठवल्यावर मात्र हसू आल्याशिवाय राहत नाही

Wednesday, January 20, 2010

मोबाईल हरवल्यावर ....

आज काल मोबाईल हरवणे ही खुप कॉमन गोष्ट झालीये . आपला नंबर तोच ठेवान्यासाठि काय करावे यासंदभ्रात मी तुम्हाला सांगणार आहे.
प्रथम कस्टमर केयर ला फ़ोन लावून सिम ब्लॉक करावे. नंतर गरजेनुसार काही कंपन्याना एफ. आय. आर. किंवा फ़क्त आय कार्ड दाखवून नविन सिम मिळते .(बीएसएनएल).
एफ आय आर साठी तुम्हाला मोबाईल बिल लागेल .तसेच एक हरवल्या संदभ्रात अँफ़ेडीवीट करुन द्यावे लागते. २० रु च्या स्टँप वर केले तरी चालते . हे दाखवून एफ आय आर करावी त्याची १ प्रत कंपनीत द्यावी. मोबाईल ऑफिस ला किंवा पुलिस स्टेशन ला तुमचे आय डी व एड्रेस प्रूफ लागु शकते . या गोष्टी बरोबर ठेवा। बिल सापडत नसल्यास किंवा एफ. आय. आर. करायची नसल्यास सिम हरवल्याची ताक्रार द्यावी . :)
ता क.:-- एफ. आय. आर. ची प्रत लगेच मिळते . नसल्यास पोलिसांना पैसे हवे आहेत असे समजने. (स्वअनुभव )

Sunday, March 29, 2009

Anubhav

काही दिवसांपुर्वी माझा मोबाईल हरवला आणि पोलिस या प्रकाराशी माझा संबंध आला. मला एफ़ आय आर ची प्रत ७२ त्तासांच्या आत मोबाईल ऑफिस ला जमा करायची होती. पोलीसांनी माझी तक्रार नोंदवुन घेतली. प्रत २-३ दिवसांनी मिळेल आणि प्रोसेसिंग ला तेवढे दिवस
लागतिलच वगैरे सांगितले.

मला ते लवकरात लवकर हवे होते म्हणुन मी त्यांना विनंती केली. मग ते म्हणाले कि उद्या दुपारी ये आणि घेउन जा. दुसरया दिवशी गेल्यावर साहेबांची आज नाईट शिफ़्ट आहे रात्री १० ला या असे सांगण्यात आले. तेवढ्या एका कागदासाठी तेच साहेब का हवेत हे मला समजत नव्हते . अशाच सलग २-३ दिवस चकरा मारल्यानंतर १ दिवस त्यानी मला १ कागद xerox करून आणायला सांगीतले
हा तोच कागद होता ज्यावर पहिल्या दिवशी त्यांनी माझी तक्रार लिहून घेतली होती .हे त्याना पहिल्या दिवशी सुध्धा करता आले असते. सुद्न्यृ वाचकांच्या हे लक्षात आलेच असेल की त्यांनी मला का चकरा मारायला लावल्या .समाधान फ़क्त हेच होते की मी कुठल्याही प्रकारची लाच दिली नव्हती .
 
Netbhet.com Me Marathi!